‘लॉकडाउन’ मध्ये पीएफ फंडाचा आधार, 1.37 लाख लोकांनी काढले 280 कोटी रुपये

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. त्याचबरोबर लॉकडाउनमुळे लाखो लोकांच्या कमाईवरही परिणाम झाला आहे. या वातावरणात लोक आपला भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ फंड काढत आहेत. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आतापर्यंत लॉकडाउन दरम्यान सुमारे 280 कोटी रुपयांच्या 1.37 लाख निकासी दावे निकाली काढले आहेत.

नवीन प्रावधानानुसार हे दावे निकाली काढण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ईपीएफओने गेल्या दहा दिवसांत हे दावे निकाली काढले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, भागधारकांनी त्यांच्याद्वारे केलेले पैसे काढणे सुरू केले आहे. कोरोना विषाणू संकटाच्या वेळी भागधारकांना दिलासा देण्यासाठी ईपीएफ नियमात बदल करण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार तीन महिन्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या बरोबर अथवा ईपीएफ खात्यात सदस्याच्या खात्यात पडून असलेल्या रकमेपैकी 75 टक्के (जे कमी असेल) निकासीची सुविधा दिली जाते. ही रक्कम भागधारकांना परत करण्याची आवश्यकता नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की सदस्य कमी रकमेसाठी अर्ज देखील करू शकतात. हे आगाऊ स्वरूपात असणार आहे. तसेच यावर प्राप्तिकर कापला जाणार नाही.

ईपीएफओने सांगितले की सर्व दावे त्वरित निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अवघ्या तीन दिवसात त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी भागधारकाच्या पीएफ खात्याचे केवायसी आवश्यक आहे.