‘लॉकडाऊन’मध्ये सरकारनं दिली सशर्त दुकाने उघडण्यास परवानगी, दारू दुकांनाबाबत झाला ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन दरम्यान देशवासीयांना दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी देशातील सर्व दुकाने सुरू होतील आणि व्यावसायिक उपक्रमांना काहीसा वेग मिळेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. तथापि, यात काही महत्त्वपूर्ण अटी देखील आहेत. गृह मंत्रालयाने आपल्या आदेशानुसार हे आदेश ग्रीन झोन क्षेत्रासाठी असल्याचे स्पष्ट केले. ज्या क्षेत्रांमध्ये हॉटस्पॉट्स घोषित केले गेले आहेत (कोरोना संक्रमित भागात) त्यांमध्ये हे आदेश लागू होणार नाहीत.

तसेच दारूच्या दुकानांनाही या वर्गात ठेवण्यात आलेले नाही. त्यांना दुकान आणि स्थापना कायदा व्यतिरिक्त इतर वर्गात ठेवण्यात आले आहे. म्हणजे दारूची दुकाने आत्ता बंदच राहतील. यासह शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल इत्यादीदेखील उघडण्यास परवानगी नाही. यासह नेहरू प्लेस, पालिका बाजार, लाजपत नगर यासारख्या बाजारपेठादेखील उघडणार नाहीत.

गृहमंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार केंद्र सरकारने निवासी वसाहती जवळ असणाऱ्या दुकानांना आणि स्टँड अलोन शॉप उघडण्यास देखील परवानगी दिली आहे. म्हणजेच अशी दुकाने जी महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत येतात. परंतु या परवानगी बरोबरच गृहमंत्रालयाने काही अटी देखील घातल्या आहेत.

या अटीनुसार, सर्व दुकाने संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत असावेत. केवळ अर्धे कर्मचारीच दुकानांमध्ये काम करू शकतील. कर्मचार्‍यांना मास्क परिधान करणे अनिवार्य असेल आणि सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे.