पुण्यात ‘लॉकडाऊन’मध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 7 जणांना प्रत्येकी 1000 रूपये दंडाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी काळात रस्त्यावर कुत्र्यांना फिरवणे आणि मास्क परिधान न करता फिरणाऱ्या 7 जणांना लष्कर न्यायालयाने प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वाजीद नासिर शेख (वय ३१, रा. कॅम्प), अमन अमजद शेख (वय १९) मोहमद तलाहा जमादार (वय ३४, रा. भवानी पेठ), हेमंत राजेश चव्हाण (वय २२ रा. भवानी पेठ), आजीम अकबर शेख (वय ३२, रा.नानापेठ), सिद्धार्थ मनोज रायजादा (वय २९) अलीम अलताफ पटेल (वय ३०, रा. कॅम्प) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
विनाकारण आणि मास्क न घालणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

यादरम्यान सात जण लष्कर भागातून रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करून फिरत होते. नाकाबंदीत पोलिसांनी त्यांना अडविले तेव्हा त्यांनी मास्क न परिधान केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात संचारबंदीचा आदेशाचा भंग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याान्वये गुन्हा दाखल केला.

त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिळमकर, राठोड, कडूकर, तांबोळी, होले, महामुलकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.