लॉकडाऊनमध्ये शिथीलता देताच शहरात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडण्यास सुरूवात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात 42 दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आता काही भागात मोकळीक मिळाली. ही मोकळीक मिळताच शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. पूर्ण शहर सील केल्यानंतर एकही गुन्हा दाखल नसताना आता दररोज गुन्ह्यात वाढ होताना पाहिला मिळत आहे. आज 13 गुन्ह्याची नोंद झाली आहे. किरकोळ स्वरूपाचे हे गुन्हे आहेत.

शहरात मार्चपासून संचारबंदी सुरू झाली. वाहने रस्त्यावर अण्यास आणि नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई होती. त्याचा परिणाम शहरातील गुन्हेगारीवर दिसला. या 40 ते 42 दिवसात अत्यल्प गुन्हे घडले. बहुतांश गुन्हे संचारबंदी किंवा सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत किंवा कायद्याचे पालन न केल्याचे होते. पुणेकरांच्या मुळावर उठलेले घरोफीचे गुन्हेगार देखील चिडीचूप होते. तर वाहणेच रस्त्यावर नसल्याने अपघात देखील कमी झाले. लूटमार, मारामारी घडली नाही.

परंतु, गेल्या पाच ते सहा दिवसात शहरातील काही भागात संचारबंदी शिथिल करत मोकळीक देण्यात आली. नागरिकांना याचा फायदा झाला तसा गुन्हेगार देखील बाहेर पडण्यास सुरुवात झाली. आता शहरात गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. मारामारी, घरफोडी, अपहरण हे गुन्हे घडत आहेत. 3 ते 4 घडणारे गुन्हे आता दिवसागणीक वाढत आहेत.

शुक्रवारी (८ मे) शहराच्या वेगवेगळ्या भागात 12 गुन्हे घडले आहेत. तर शनिवारी (9 मे) 13 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संचारबंदीत पहिल्यांदाच दोन दिवसात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले. मोकळीक मिळल्याने चौकाचौकातील टोळक्यांमध्ये मारामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यातील एक निरीक्षण करताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, मद्यविक्रीवरील निर्बंध शिथिल होताच मारामारीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.