Lockdown : ‘कोरोना’च्या संकटामुळं एकता कपूरनं सोडून दिला एक वर्षाचा पगार, नाही घेणार अडीच कोटी रूपये

पोलीसनामा ऑनलाईन : टीव्ही सीरियल्सच्या जगातील सर्वात मोठी प्रोड्युसर एकता कपूर हिनं कोरोना व्हायरसमुळं होणारं नुकसान पाहून मोठा निर्णय घेतला आहे. तिनं तिचा एका पूर्ण वर्षाचा पगार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एकता तिच्या प्राडक्शन हाऊसमधून प्रतिवर्षी 2.50 कोटींची सॅलरी घेत असते.

सध्या लॉकडाऊन असल्यानं सर्वकाही ठप्प आहे. सर्व मालिकांची शुटींग बंद झाली आहे. अशात एकतानं मोठा निर्णय घेतला आहे.

एकतानं तिचं एक स्टेटमेंट जारी केलं आहे ज्यात ती म्हणते, “कोरोनामुळं झालेले परिणाम खूप व्यापक आणि बहुआयामी आहेत. देशाला प्रोत्साहन मिळेल असं काही आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी त्या डेली वेजेसवर काम करणाऱ्या आणि फ्री लान्सरप्रति आहे जे बालाजी टेलीफिल्म्समध्ये काम करतात. शुटींग बंद झाल्यानं ज्यांना खूप सहन करावं लागत आहे.”

एकता पुढे म्हणते, “हे कधी पर्यंत चालणार आहे हेही माहिती नाही. त्यामुळं मी माझा एका वर्षाचा पगार जो बालाजी टेलीफिल्म्समध्ये 2.5 कोटी आहे तो सोडणार आहे. जेणेकरून माझ्या साथी कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये. पुढे जाण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सोबत चालणं. सुरक्षित रहा. निरोगी रहा.”