हे केवळ एक चित्र नाही तर एक ‘सत्य’ कथा ..

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हे केवळ एक चित्र नाही तर एक सत्य कथा आहे. ज्याचे पात्र आणि घटना काल्पनिक नाहीत. ही अशी गोष्ट आहे, जी कदाचित पुढच्या कित्येक दशकांपर्यंत लक्षात राहील. आपण याला मजबुरी, स्थलांतर, जुगाड किंवा गरीबी देखील म्हणू शकता. पण हे सत्य बदलणार नाही. कुठल्याही बातमीचे माध्यम पाहून तुम्हाला देशभरातील कामगारांच्या स्थलांतरांची माहिती मिळेल. परंतु किती लोक हे समजतात की ते केवळ कामगारच नाही तर आधुनिक समाजाचा पाया देखील आहे, ज्यामुळे शहर आणि तथाकथित समृद्धी उभी राहते.

गेल्या 50 दिवसात हा पाया खचला आहे. दुसऱ्या बाजूला काय दिसते ते अद्याप समजलेले नाही. आपल्या देशात साथीचे रोग, दुष्काळ आणि उपासमार, दंगा आणि नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आहेत. पण हा पाया त्यांना सहन करत होता. पण एका विषाणूने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. असा कोणताही देश म्हणू शकत नाही की, कोरोनाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. आपला देशही यापासून वाचू शकला नाही. हे चित्र या गोष्टीचा मजबूत आणि धक्कादायक पुरावा आहे. जो शब्दांत व्यक्त करता येणे अवघड आहे.

ही चित्रे देखील यातीलच एक भाग आहे जी आजकाल आपल्या सर्वांना हादरवून टाकत आहे. कामगारांनी घरची वाट पकडली आहे, मिळेल त्या वाहनाने अन्यथा पायी हजारो मैलाचा प्रवास सुरु आहे.