Lockdown : Flipkart नं पुन्हा सुरू केले ‘ऑपरेशन’, Amazon करतंय सरकार सोबत ‘चर्चा’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  बुधवारी आपले कामकाज तात्पुरते बंद केल्यानंतर वॉलमार्टच्या मालकीची कंपनी फ्लिपकार्डने स्थानिक प्रशासनाला त्याच्या पुरवठा साखळीचे सुरक्षित संचालन व वितरण कर्मचार्‍यांच्या अखंडित हालचालीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी किराणा व जीवनावश्यक सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अ‍ॅमेझॉनने म्हंटले कि, आवश्यक वस्तूंचे वितरण सुरु करण्यासाठी सरकारी एजन्सींशी चर्चा सुरु आहे.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन यांनी बुधवारी सकाळी आपली कामे तात्पुरती बंद केली होती. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला.

फ्लिपकार्टचे ग्रुप सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक कायदेशीर अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, आमची पुरवठा साखळी आणि डिलिव्हरी कर्मचार्‍यांना सुरक्षित व सुरळीत मार्ग देण्यात येईल, म्हणून आम्ही आमच्या किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या पॅंट्री पेजवर सांगितले गेले आहे की, प्रिय ग्राहक, स्थानिक निर्बंधांमुळे आम्ही वितरित करण्यात अक्षम आहोत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. आमच्याकडे नवीन अपडेट आल्यावर आम्ही आपल्याला ईमेल / एसएमएसद्वारे कळवू. अ‍ॅमेझॉनने ग्राहकांना त्यांचे ऑर्डर रद्द करण्याचा पर्यायही दिला आहे.

गेल्या काही आठवड्यांत भारतामध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील ऑर्डरच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक ऑनलाइन ऑर्डरद्वारे अन्न व घरगुती उत्पादने साठवत आहेत. स्नॅपडीलने एका निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक परिस्थितीनुसार ते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आवश्यक वस्तू पोचवित आहेत.

You might also like