Lockdown : फार्महाऊसवर ‘भाईजान’ सलमानसोबत राहते गर्लफ्रेंड ? ‘व्हिडीओ’ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सर्व कलाकार आपापल्या घरात आहेत. अभिनेता सलमान खानही त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. अशात सलमाची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सलमान खाननं रविवारी(दि 5 एप्रिल 2020 रोजी) एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात युलिया हॉर्स रायडिंग करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना सलमान म्हणतो की, खूप दिवस झाले आहेत याला.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता चाहते असा अंदाज लावत आहेत की, युलिया देखील सलमानच्या फॅमिलीसोबत त्याच्या फार्म हाऊसवर आहे. त्यानं काही आणखी व्हिडीओदेखील शेअर केले ज्यामुळं चाहत्यांना संशय आणखी बळावला आहे.

एक व्हिडीओ असा आहे ज्यात सलमान घोड्याला चारा खाऊ लागत आहे. हाही व्हिडीओ फार्म हाऊसवरील आहे. परंतु असं असलं तरी हे व्हिडीओ लेटेस्ट आहेत की, जुने आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.