आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला रोखले, महिला पोलीस कर्मचार्‍यावर बदलीची कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कर्फ्यू असतानाही आपल्या मित्रांसोबत फिरणार्‍या आरोग्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आल्याने महिला पोलीस कर्मचार्‍याची बदली करण्यात आली आहे. सूरतमध्ये ही घटना घडली असून यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. पोलीस राजकीय दबाबाखाली काम करत असल्याची टीका होऊ लागली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य आरोग्यमंत्री आणि आमदार कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी आणि त्याच्या मित्रांनी रोखण्यात आल्यामुळे कॉन्स्टेबल सुनीता यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने सुनीता यादव यांनी प्रकाश याच्या मित्रांना रोखले. यानंतर त्यांनी प्रकाश याला फोन करुन बोलावून घेतले.

यानंतर त्याने सुनीता यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मी वर्षभर याच ठिकाणी तुला उभे राहण्यास भाग पाडू शकतो, अशी धमकीही यावेळी त्याने दिली. यावेळी सुनीताने तुमची गुलाम नसल्याचे उत्तर दिले. वादानंतर सुनीताची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. रविवारी प्रकाश आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांनी जामिनावर सोडण्यात आले.