महाराष्ट्रातील Lockdown आणखी 15 दिवसांसाठी वाढणार? ठाकरे सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे सध्या 15 मे पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन वाढवून 30 मेपर्यंत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढविण्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे आता 30 मेपर्यंत हा लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून सलग 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. इतकेच नाही तर मृतांचा आकडाही 4 हजारावर पोहोचत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन,इंजेक्शन, बेड, लसीची तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. अशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.