Lockdown in Maharashtra : आगामी 2 दिवसात आपण निर्णय घेऊयात ! कडक लॉकडाऊनचे संकेत देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘राज्यातील लोकांना समजावू शकतो पण कोरोनाला नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वत्रच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (शनिवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे महत्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आता ती बैठक पार पडली आहे. बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांची मत जाणून घेण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही असं स्वतःचं मत मांडलं. सध्या सर्वपक्षीय बैठक संपली असून राज्यातील लॉकडाऊन बाबत आगामी 2 दिवसांमध्ये आपण सर्वजण निर्णय घेऊयात असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळं राज्यात आगामी काळात 100 टक्के लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपुर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवत व्यापारी आणि सर्वसामान्यांची बाजू मांडली. कडक आणि संपूर्ण लॉकडाऊन केला तर जनते उद्रेक करेल. आपण त्यांची भावना समजून घेतली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. एकंदरीत बैठकीत झालेल्या चर्चेवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असेच संकेत दिले आहेत. आगामी 2 दिवसांमध्ये लॉकडाऊन बाबत आपण सर्वजण निर्णय घेऊयात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यात असणारे परराज्यातील मजुरांनी यापुर्वीच स्वगृही परतण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय सोमवार किंवा त्यानंतर होणं अपेक्षित आहे. मात्र, राज्यात 100 टक्के लॉकडाऊन लागू शकतो असेच संकेत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून मिळत आहेत. सर्वपक्षीय बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सांगितले की, राज्यातील जनतेला समजावू शकतो पण कोरोनाला नाही.