Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील pune कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी शहरातील कोरोना निर्बंध  Pune Lockdown अद्याप हटवले नाहीत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 6.11 टक्के इतके असल्याने तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. 1.1 टक्के कोरोना बाधित रुग्ण अधिक असल्याने पुण्यातील pune कोरोना निर्बंध Pune Lockdown जैसे थे ठेवले आहेत.

तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय

शासनाच्या नियमावलीनुसार पुण्यात 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण असते, तर दुकाने दिवसभर खुली ठेवण्यास परवानगी मिळाली असती.

तसेच नाट्यगृहे, मॉल 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली असती.

शिवाय खासगी अन् शासकीय कार्यालये, सार्वजिनक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता आली असती.

राज्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंध हटवले जात आहेत.

शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरून शहरातील निर्बंध हटवायचे की नाही? याचा निर्णय घेतला जात आहे.

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार शहरांची विविध स्तरात विभागणी केली जात आहे.

अशातच पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण शासन नियमावली पेक्षा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे.

त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे.

पुढील आठवड्यात निर्बंध हटण्याची शक्यता

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्याने घटत आहे.

हा कल कायम राहिल्यास पुढील आठवड्यापर्यंत पुण्यातील कोरोना निर्बंध जवळपास हटण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत येईल.

त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार जवळपास सर्व निर्बंध हटवले जाऊ शकतात.

Pune : सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार; संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी

 

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

 

चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाबाबत केलेल्या विधानाचा संजय राऊतांकडून समाचार, म्हणाले…

 

 

भारतीय महिला फेडरेशनची मागणी, म्हणाले – ‘कष्टकरी, कामगारांना कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या’

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याचीमाहिती