रामेश्वरमधील लोककलाकारांचे हाल

रामेश्वर – वृत्त संस्था  – तमिळनाडूतील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरं महत्त्व म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या रामेश्वरचेच. देशभरातून हजारो पर्यटक तीर्थाटन करण्यासाठी रामेश्वरला जात असतात. त्याचबरोबर लाखो पर्यटक इथला समुद्रकिनारा पहायलाही येत असतात. त्यामुळे रामेश्वरमध्ये तीर्थाटनासाठी येणारे भक्त आणि पर्यटक यांच्यावर इथले सगळे व्यवसाय अवलंबून आहेत.

https://twitter.com/AHindinews/status/1261129435807223808/photo/4

कडाउनमुळे रेल्वे बंद झाल्याने या सगळ्यांच्या उद्योगाला आणि रामेश्वरच्या अर्थचक्रालाच फटका बसला आहे. इथल्या समाजाचा असाच एक घटक आहे तो म्हणजे धार्मिक कार्यक्रम आणि लग्नांतवगैरे जाऊन आपली लोककला सादर करणारे कलाकार. या कलाकारांची उपजीविका यावरच चालते. रोज रामेश्वरमध्ये काही ना काहीतरी समारंभ सुरू असतात.

पण लॉकडाउनमुळे हे सगळे समारंभ बंद झाले आहेत. त्याचा फटका या लोककलावंतांना बसला असून त्यांना दोन वेळचं अन्न मिळणं मुश्किल झालं आहे. गेल्या 50 दिवसांपासून इथे कुठलाच कार्यक्रम झालेला नाही त्यामुळे रामेश्वरमध्ये राहात असलेल्या लोककलाकारांच्या 100 कुटुंबियांचे खूप हाल होत आहेत.