कोकण-खेड युवाशक्तीतर्फे गरजु कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप !

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – कोकण-खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड शहरात रोजगारासाठी आलेल्या परंतु ज्यांची परिस्थिती गरीब आहे. अशा गरजु पन्नास कुटुंबीयांना युवा शक्तीकडुन किराणा वाटप करण्यात आले.

image.png

परंतु हे कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ काढुन त्याची सोशल मिडियावर पोस्टरबाजी न करता गरजुंना मदत केली. त्यांची कोठेही सोशल मिडियावर वाच्यता करण्यात येत नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच भावनेतुन मंडळातील काही कार्यकर्त्यांनी आपआपल्या परिसरातील गरजु,गरीब कुटुंबीयांसाठी पंधरा ते वीस दिवस पुरेल इतके किराणा देण्याची व्यवस्था घरपोच  केली. आपण केलेली मदत ही मदत नसुन अडचणीत सापडलेल्यांना सहकार्य करणे ही आपली संस्कृती आहे असे,मंडळातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.कोठेही गर्दी,गोंधळ न करता सोशल डिन्सिंगचे नियम पाळत हे कर्तव्य युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी केली.असेच कार्य करणे आज गरजेचे आहे.

image.png

नाही तर करणी चार आण्याची आणि गाजवाजा बाराण्याचा असेच आज चिञ दिसुन येत आहे.अडचणीच्या काळात मदत करणे व त्यांची कोठेही वाच्यता न करणे यांत खरे दानाचे महत्त्व लपलेले आहे. युवाशक्तीला मदत केलेल्या सर्व दानशुर लोकांचे युवाशक्ती सदैव ऋणी आहे.

image.png
image.png