कांद्याचे व धान्यचे लिलाव अनिश्चित काळासाठी बंद

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे व धान्यचे लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने तोट्यात कांदा विक्री करणाऱ्या कांदा उत्पादकांचा कांदा तीव्र उन्हामुळे खराब होण्याच्या प्रमाणात वाढ होत आर्थिक नुकसान होत तोट्यात भर पडणार असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली.

लासलगाव येथील डॉक्टर आणि नर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव आणि पिंपळगाव नजीक येथे शंभर टक्के लॉक डाऊन करत संचारबंदीची अमलबजावणी कडक करण्यात आल्याने लासलगाव बाजार समितीतील कांदा व धान्य लिलाव पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने अनिश्चित काळासाठी कांदा आणि धान्य लिलाव बंद राहणार आहे कोरोना तपासणी अहवाल मंगलवारी उशिरा रात्री आल्याने 926 वाहनातून कांदा लिलावसाठी आला होता कांद्याला सध्या उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाल्याने कांदा उत्पादकांची नुकसान होऊ नये यासाठी 18 हजार क्विंटल आलेल्या कांद्याचे लिलाव करण्यात आले त्याला जास्तीतजास्त 951 रुपये ,सरासरी 630 रुपये तर कमीतकमी 300 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.