राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये आणखी 15 दिवस लॉकडाऊन Lockdown वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा दर नियंत्रित असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पुण्यातील साखर संकुल येथे एका बैठकीसाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या सादरीकरणामध्ये राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांवर आहे. या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची उपलब्धता इत्यादी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन Lockdown वाढवावा असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सध्या असलेले निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. यामध्ये दुकानांच्या वेळा वाढविण्याबाबत विचार केला जाईल. रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध पुढील 15 दिवस कायम असतील असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले, लशी घेण्यासाठी निधीची कोणतीही अडचण नाही. रोज 8 ते 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची आरोग्य विभागाची क्षमता आहे. त्यासाठी फक्त केंद्राने आम्हाला लस उपलब्ध करुन दिली पाहिजे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी