Lockdown: अभिनेत्री रश्मी देसाईसाठी ‘लॉकडाऊन’ ठरलं ‘वरदान’ !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यानं स्टार्स मंडळीदेखील आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. अभिनेत्री रश्मी देसाई हीदेखील सध्या फॅमिलीला वेळ देत आहे. आपल्या कुटुंबातील बिघडलेली नाती सुधारण्यासाठी तिला वेळ मिळाला आहे.

रश्मीनं तिच्या इंस्टावरून कुटुंबीयांसोबतच अनेक फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाईचं तिच्या आई आणि भावासोबत अनेक वर्षांपासून नातं खराब राहिलं आहे. बिग बॉस 13 मध्ये या गोष्टीचा खुलासा झाला होता. अरहानमुळं तिचं इमोशनल ब्रेकडाऊन झालं होतं.

मुलीला संकटात पाहून रश्मी देसाईच्या आईचं काळीज पाघळलं. रश्मीचं आणि तिच्या आईचं अनेक वर्षांपासून बोलणं नव्हतं झालं. अशात आईला फिनालेच्या दिवशी पाहून रश्मी इमोशनल झाली होती. आजकाल ती आपल्या आईसोबत खूप खुश दिसत आहे.

रश्मीनं तिच्या आईसोबत एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “सेल्फ क्वारंटाईनला आईसोबत शेअर करून मी खूप खुश आहे.” रश्मीनं कुटुंबातील सर्वांसोबत फोटो शेअर केला आहे. सर्वजण खूप खुश दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B-W1KYAAPcC/

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती नागिन 4 मालिकेत काम करताना दिसत आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत आहे. रश्मीनं जास्मीन भसीनली रिप्लेस केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-WZnn1A1nu/

https://www.instagram.com/p/B-UW25zAKJo/

https://www.instagram.com/p/B-WD7jggi1Z/

https://www.instagram.com/p/B-RJBADAaTn/

https://www.instagram.com/p/B-QxGAkgt5w/