Lockdown : हातावरचं पोट असणाऱ्यांना ‘लॉकडाऊन’मुळं वर्तमानासह भविष्याची मोठी ‘चिंता’, मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी ‘हाक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन (कुमार चव्हाण) – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन केंद्र सरकारनं लागू केला आहे. लॉकडाऊनमुळं सर्वकाही ठप्प आहे. याचा जास्त फटका हा हातावचं पोट असणाऱ्यांना बसताना दिसत आहे. अनेक नेते मंडळी तसेच सामान्य नागरिक आपापल्या परीनं इतरांना मदत करत आहेत. अशीही काही लोकं आणि कलाकार आहेत ज्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचत नाही. त्यांचे कार्यक्रम बंद असल्यानं त्यांचं सारं आर्थिक उत्पन्न बंद आहे ज्यामुळं त्यांच्यासमोर जगण्याच आणि कुटुंबाचा मोठा प्रश्न उभा राहिला. याची झळ त्यांच्या मुलांसहित पूर्ण कुटुंबियांना सहन करावी लागत आहे. असात एक कलाकार आहे अंकुश रणजित यादव आणि त्यांच्या ग्रुपमधील गायक, वादक, ग्रुपमधील सर्व निर्माता आणि इतर काही कलाकार.

Lockdown : हातावरचं पोट 'लॉकडाऊन'मुळं भविष्याचीही मोठी 'चिंता',

Lockdown : हातावरचं पोट 'लॉकडाऊन'मुळं भविष्याचीही मोठी 'चिंता', मुंबईचा कलाकार अंकुश यादवची सरकारला मदतीसाठी 'हाक' !

Geplaatst door Policenama op Zondag 5 april 2020

अंकुश रणजित यादव (रा.मुलुंड मुंबई 400080, मोबाईल नंबर- 7738554404/8850335908) हे एक स्वतंत्र निवेदक आहेत. आजवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. परंतु सध्या सारं काही बंद असल्यानं त्यांच्या कार्यक्रमालाही पूर्ण विराम मिळाला आहे ज्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर आणि रोजच्या जगण्यावर झाला आहे. पोट भरण्यासाठी त्यांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक कलाकार आणि निवदेक अंकुश यादव यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

अकंशु यादव म्हणाले, “महापुरुषांची जयंती किंवा कोणत्याही निमित्तानं जे सार्वजनिक कार्यकम आयोजित केले जातात त्यात मी स्वतंत्र निवेदनाचं काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालतं. सध्या देशात सुरू असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळं आम्हाला जगण्यात अडचणी येत आहेत. आमच्याजवळ जे काही पैसे होते तेही संपण्याच्या मार्गावर आहेत. आमची भारत आणि राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की, त्यांनी याकडे लक्ष घालावं आणि आमच्या आर्थिक उत्पन्नासाठी किंवा आमच्या अडचणी दूर करण्यासाठी काही मदतीची पावलं टाकावी.”

आपल्या अडचणी सांगत पुढे बोलताना अंकुश यादव म्हणाले, “आधीच काही कार्यक्रम आमच्या हातून निसटले आहेत. सध्या आमचा सीजन सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमुळं आर्थिक उपत्नासाठी कोणतीही संधी उपब्ध होत नाही. आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाळा सुरू झाला की, आम्हाला कार्यक्रम करता येत नाही. याशिवाय आता जर आम्हाला काही उत्पन्न नाही मिळालं तर पावसाळा काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळं आमची अडचण फक्त तात्पुरत्या स्वरुपाची नसून याचा त्रास आगामी काळातही होणार आहे. आमच्यावर बायको-मुलांचीही जबाबदारी आहे. या सगळ्याची झळ त्यांनाही सोसावी लागत आहे. माझ्या सोबत काम करणारे गायक, वादक, बॅक स्टेज कलाकार, ग्रुपमधील सर्व निर्माता आणि इतरही सहकलाकार आहेत जे या परिस्थितीचा सामना करत आहेत.”

अंकुश यादव म्हणाले, “माझ्यासारखे इतरही अनेक कलाकार आहेत जे समोर आले नसतील. मी माझ्याकडून आणि माझ्यासोबत असणाऱ्या व माझ्यासारख्या सर्व कलाकारांच्यावतीनं भारत आणि राज्य सरकारला हात जोडून विनंती करतो त्यांनी याची दखल घ्यावी आणि आमच्या मदतीसाठी काही पावलं उचलावीत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ट्विटरवरून पत्र पाठवत संपर्क केला आहे. परंतु अद्याप मला त्यांच्या कार्यालयाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. लवकरात लवकर आमची दखल घेण्यात यावी ही माझी विनंती.”

You might also like