… म्हणून मुंबई, पुण्यासह ‘कोरोना’चे रूग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील वाढणार लॉकडाऊन ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील विविध भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा व्हारयस वेगाने पसरत आहे. लॉकडाउनचे 15 दिवस उलटले असतानाही कोरोना कमी होत नाही. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी न झाल्यास मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील लॉकडाउन वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू होऊन 15 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (8.33 टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब (7.89 टक्के)आणि हिमाचल प्रदेश (7.69 टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.