लॉकडाऊन काळातही मुंबई शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील राहिली : महापौर पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशव्यापी लॉकडाऊन (lockdown) काळात मुंबईत अत्यावश्यक सेवा कोणत्याही गोंधळाशिवाय पुरवून शाश्वत विकासासाठी (sustainable-development) प्रयत्नशील राहिली. प्रभागस्तरीय नियंत्रण कक्षामार्फत तपासणी, चाचणी, विलगीकरणाच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत. प्रभागस्तरीय आपत्कालीन कक्षाने अत्यंत कार्यक्षमतेने कार्य केले आहे. धारावी सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात जनजागृती संनियंत्रण मोहीम राबविण्यात आली होती. जागितक आरोग्य संघटनेने कोविडवर नियंत्रण आणण्यासाठी राबवलेल्या धारावी मॉडेलचे कौतुक केले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

ब्रिक्स मैत्री शहरे आणि स्थानिक शासन कार्य मंच, रशियन फेडरेशन यांच्या वतीने आयोजित वेबिनार परिषदेला संबोधित करताना महापौर बोलत होत्या. ब्रिक्स राष्ट्र समुहाच्या आधुनिक शहरात शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यावर अधिक भर देणार असल्याचे फेडणेकर यांनी सांगितले. ब्रिक्स राष्ट्रामध्ये भारत, रशिया, चीन, ब्राझीन, दक्षिण आफ्रिका आदी देशांचा सहभाग असून भारतातर्फे मुंबई हे शहर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी महापौर म्हणाल्या की, निरोगी जीवनाची हमी देणे, दर्जेदार शिक्षण, रोजगाराची समान संधी पुरवणे या द्वारे शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो. राहणीमानाचा दर्जा, शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी सुधारीत करण्यास महापालिकेच्या स्तरावर आम्ही कटीबध्द आहोत.

संयुक्त राष्ट्राद्वारे निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दीष्टये साध्य करण्याकरिता गेल्या महिन्यात परवडणा-या आणि दर्जेदार आरोग्य सेवा, स्थलांतरीत कामगार आणि बेघरांसाठी अन्न पुरवणे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, हरीत कवच वाढविणे, स्थानिक उद्योजकामध्ये नवनिर्मिती करता महिला बचत गटाच्या बचतगटातंर्गत स्थानिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आदी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान संकटाच्या वेळी जग भारतीयांच्या आणि विशेष करून मुंबईकरांच्या मैत्रीस केंव्हाही साद घालू शकेल, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.