Lockdown in Maharashtra : सर्वपक्षीय बैठक सुरूच ! मुख्यमंत्री ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वदूर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनावर कंट्रोल मिळवण्यासाठी राज्य सरकारने यापुर्वी कडक निर्बंध घातले होते. त्यानंतर राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन जाहीर केला. तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही आणि आपण सर्वांनी एकमताने हा निर्णय घ्यायला हवा, लॉकडाऊन लावल्यासच महिन्याभरात परिस्थितीवर कंट्रोल आणता येईल असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजची सर्वपक्षीय बैठकीत मांडले. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी जनतेच्या भावनांचा विचार करायला हवा आणि विचार करूनच निर्णय घेतला जावा अशी भुमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मांडली आहे.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वच पक्षांची मत जाणून घेण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसने देखील संपुर्ण लॉकडाऊनला काहीसा विरोध दर्शविला आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही असं स्पष्ट केलं आहे. अद्यापही लॉकडाऊनबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, आगामी परिस्थिती पाहून राज्य सरकार 7 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी देखील राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. लॉकडाऊन लावला नाही तर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल असा इशाराच कुंटे यांनी दिला आहे.