महावितरणचे उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आता दुसरा लॉकडाऊन संपताच महावितरणे (MSEDCL) पुन्हा थकीत वीज बील (Overdue electricity bill) वसुली मोहीम राबवण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. वीज निर्मिती अन् कर्जावरील व्याजाच्या बोजा यामुळे महावितरण (MSEDCL) संकटात सापडली आहे. त्यामुळे थकीत वीज बिलांची (Overdue electricity bill) वसुली गरजेची असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात वीज बीलांची वसुली सुरु होणार आहे. (Recovery of electricity bills in the state from tomorrow)

Buildings Risk of Collapse in Mumbai | मुंबईतील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी MHADA कडून जाहीर

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांचे रोजगार बुडाले होते.
या काळात महावितरणने (MSEDCL) ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवून जखमेवर मीठ चोळले होते.
त्यातच सत्ताधाऱ्यांनी वीज बिलमाफीची पुडी सोडल्याने लोकांनी बिले बरण्यास टाळाटाख केली होती.
महावितरणने अचानक वसुली सुरु करताच राज्यातील राजकीय  वातावरण तापले होते.
तसेच लोकांचाही रोष कर्मचा-यांना सहन करावा लागत होता.
कधी वीज मीटर बंद तर कधी डीपीच बंद केले होते. आता दुसऱ्या लॉकडाऊनमध्येदेखील ग्राहकांनी बिले भरली नाहीत.
महावितरणची गेल्या वर्षीपासून मे 2021 पर्यंत 6334 कोटींची बिले थकलेली आहेत.
2020-20 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी आणि मे 2021 मध्ये 1386 कोटी रुपये थकीत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होणारा कोणताही निर्णय घेणार नाही’

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

 

Web Title : lockdown over msedcl recover overdue electricity bills tomorrow