Coronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या संकटसमयी तुमच्यासाठी मोदी सरकार चालवतंय ‘या’ स्कीम, जाणून घ्या लिस्ट

नवी दिल्ली, : वृत्त संस्था – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रभावी पावले उचलली आहेत. गरीबांपासून ते आरोग्य कामगाऱ्यांच्या संरक्षणासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. जाणून घेऊया त्या योजनांसंर्दभात…

फूट सेक्युरिटी अंतर्गत, दरमहा 5 किलो गहू / तांदूळ उपलब्ध होईल. यासह केंद्र सरकारने प्रति व्यक्ती एक किलो डाळ देण्याची घोषणा केली आहे. हे रेशन टीपीडीएस प्रणालीत प्राप्त झालेल्या रेशनपेक्षा वेगळे आहे.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता वेळेपूर्वीच जाहीर केला. याशिवाय 31 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जाची थकबाकी जमा करायची होती, त्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. 31 मेपर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे द्यावे लागणार नाहीत.

गरिबांच्या संरक्षणासाठी मोदी सरकारने मनरेगा अंतर्गत कामगारांचे रखडलेले वेतन 4431 कोटी रुपये जाहीर केले आहे. तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या कुटुंबांना 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी सरकारने जाहीर केले आहे की, जर कोणी उपचार घेत असताना मरण पावला तर त्याच्या कुटूंबाला 50 लाख रुपये दिले जातील. आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ, आशा कामगार, वॉर्ड बॉय, नर्स, पॅरामेडिक्स, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयातील तज्ञ यांचा समावेश आहे.

इतर मोठ्या घोषणांमध्ये सरकारने पेन्शन घेणाऱ्यांना 1000 रुपये रोख आणि 3 महिन्यांच्या पेन्शन अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विधवा आणि दिव्यांग यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सरकारने निधीही जारी केला आहे. त्याशिवाय घरी परतू न शकणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी 21 हजार मदत शिबिरे सुरू केली आहेत.