Lockdown : ‘तल्लफ’ पडली मोठी ‘महागात’, ‘बिडी’साठी गेला ‘गजागाड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन असल्याने पान, सिगारेट, तंबाखु, दारु हे सर्व बंद करण्यात आले आहे. असे असले तरी शहरात ठिकठिकाणी त्याची अवैधरित्या काळाबाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु आहे. लोकांना या व्यसनाची सवय लागलेली असल्याने त्याशिवाय अनेकांना सहन होत नाही. त्याचा त्यांना त्रास व्हायला लागतो. असाच काही जणांना बिडी न मिळाल्याने त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी चक्क पान टपरी फोडली व त्यातील बिडी बंडल व इतर वस्तू लांबविल्या. मात्र, हे करत असताना गस्त घालणार्‍या पोलीस आले. त्यामुळे त्याला गजाआड जावे लागले.

ही घटना वाकड येथील काळाखडकमधील साई पान शॉप येथे बुधवारी पहाटे दीड वाजता घडली. पोलिसांनी रमेश मल्लाप्पा येगरे (वय ३३, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) याला अटक केली आहे. तर, राहुल चव्हाण व त्याचे इतर तीन साथीदार पळून गेले आहेत.

रमेश येगरे व इतरांनी साई पान शॉपचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. टपरीमधील कॉटन स्वॅब बंडल, कोलगेट मॅट्रोस नॅचरल इमली कोकनेट कँडी गोळ्याच्या ३ बरण्या व रोख रक्कम असा १ हजार९२० रुपयांचा माल चोरला. तो चोरुन नेत असतानाच पोलीस तेथे आले. रमेश येगरे त्यांच्या हाती लागला. वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक अमित खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.