‘कोरोना’मुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईची लोकल बंदच !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल सेवा कधी सुरू होणार याचे उत्तर रेल्वे मंत्रालयाने अद्यापही दिले नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेच्या सर्व नियमित सेवा बंद राहतील असे रेल्वेच्या आदेशात म्हटले आहे. पण नेमक्या केव्हापर्यंत गाड्या धावणार नाहीत याची तारीखच रेल्वेने जाहीर केली नाही.

पूर्व रेल्वेचे लोकल ट्रेनसह नियमित गाड्या 30 सप्टेंबरपर्यंत बंद अशा आशयाचे परिपत्रक सोशल मिडियात फिरल्याने मुंबईपासून पार गावापर्यंत सर्वांना धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या लॉकडाऊनच्या टप्प्यात मध्य रेल्वे सोडून रेल्वे गाड्यांसंदर्भात इतर सर्व झोनची परिपत्रके आल्यानंतर मध्य रेल्वेला जाग यायची. त्यामुळे हे पत्र खरेच समजून ब्रेकिंग स्टोऱया झाल्या.

त्यानंतर रेल्वे बोर्डाने धावत पळत आज आम्ही काही परिपत्रक काढलेच नाही स्पेशल ट्रेन चालूच राहतील असे स्पष्ट केले. परंतु स्पेशल ट्रेन चालूच राहणार यात काही नाविन्य नव्हते, प्रवाशांना त्यांची रोजची रोजीरोटी देणाऱया लोकलची बातमी हवी होती. त्याबाबत आज रेल्वेने पुन्हा परिपत्रक काढले तेही प्रवाशांना कोडयात टाकणारेच निघाले. यात कोणतीही तारीख जाहीर न करता ‘पुढील सूचना मिळेपर्यंत लोकल बंदच राहतील असे म्हटले होते.