‘लॉकडाऊन’मध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटयांनी वकिल महिलेवर केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मात्र, अशा परिस्थितीत गुन्हे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. दिल्लीच्या जंगपुरा येथे एका वकील महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीने महिला घरात एकटी असल्याचे पाहून तिला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कारानंतर आरोपीने तिचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करून तेथून पळू गेला होता. महिलेचा मृत्यू झाला असल्याचा समज आरोपीचा झाला होता. ही घटना शुक्रवारी घडली आहे. पोलिसांनी सोनू नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवून आवाज केला तर चाकूने वार करून ठार मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर आरोपी एका सीसीटीव्हीत दिसला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी सोनूने चौकशीत सांगतले की, त्याने चोरीच्या उद्देशाने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला होता. जेव्हा त्याने महिला एकटी असल्याचे पाहीले तेव्हा, त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्या महिला वकिलाची गळा आवळून खून केल्याचे आरोपीने सांगितले.

गळा आवळल्याने महिला बेशुद्ध पडली होती. मात्र आरोपीला ती महिला मृत झाल्याचे वाटले. त्यानंतर त्याने महिलेचे डेबीट कार्ड, घरात ठेवलेली रोकड आणि काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन फरार झाला. आरोपीवर आणखी काही गुन्हे नोंद आहेत. आरोपी हा तैमूर नगर दिल्लीचा रहिवासी आहे. पोलीस सुत्रांनी सांगितले की, घटनास्थळापासून काही अंतरावर एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला. चौकशीत महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.