लॉकडाऊन दरम्यान मद्यविक्री, 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आसून त्या पार्श्वभूमीवर देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची विक्री बंद आहे. राज्यात मद्यविक्री बंद असताना देखील या कालावधीत अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 1221 गुन्हे दाखल करून 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 472 आरोपींना अटक करण्यात आली असून 36 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती विभागाने दिली आहे. शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभाग 24 तास कार्य़रत आहे.

इतर राज्यातून महाराष्ट्रात अवैध मार्गाने मद्याची तस्करी रोखण्यासाठी विभागने नाकाबंदी केली असून गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करत आहेत. तसेच 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
अवैध मार्गाने मद्याची वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्यासाठी विभागाने नियंत्रण कक्ष उभारले आहे. या ठिकाणी नागरिकांनी तक्रारी कराव्यात. तसेच तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. अवैध मद्य विक्रिविरोधात नागरिकांनी पुढाकार घ्यावार असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like