सांगलीत तळीरामांनी घातलाा धुमाकूळ, एकाच दिवशी दारुची 3 दुकाने फोडली

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. अशातच सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी तीन दारुची दुकाने फोडल्यात आली आहेत. तळीरामांनी कवठेमहांकाळ आणि मिरजेतील तीन दुकाने फोडून लाखो रुपयांच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या लंपास केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कडकडीत संचारबंदी आहे. अशात दारु पिणार्‍यांची मोठी अडचण झाली आहे. लॉकडाऊनमध्येही तळीराम मिळेल त्या किंमतीत दारु विकत घेत आहेत. दारुची सर्व दुकाने बंद करण्यात आल्यामुळे तळीरामांची अडचण होत आहे. त्यामुळे त्यांनी थेट दारुच्या दुकानांनाच लक्ष्य केले आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारी दारुची दुकाने फोडून लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्यांची चोरी करण्यात आली. कवठेमहांकाळ इथल्या कुची रोड, काळे प्लॉटवर ओंकार काळे यांचे किनारा परमिट रुम आणि बिअर बारचे शटर उचकटून विदेशी दारु आणि बिअर चोरुन नेली आहे. परमिट रुमच्या मागील दरवाजाचा कुलूप तोडून आणि आतील शटर उचकटून विदेशी आणि बिअर अशी एकूण 75 हजार 500 रुपयांची दारु लंपास केली. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.