Lockdown : पुण्यात सिंहगड रस्ता परिसरातील काही भाग ‘सील’ ! गरज भासल्यास शहरातील इतर भाग टप्प्याटप्याने सील : आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून या संसर्गाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग सील (कर्फ्यु) केला आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील इतर भाग देखील टप्याटप्याने सील करण्यात येईल असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. तसेच आज सिहंगडमधील काही भाग सील करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त संभाजी पाटील, शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आला आहे. त्यानंतरही काही विशिष्ट भागात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे.

एकमेकांच्या संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समाजातील अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येवू शकते. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी दि. 6 एप्रिल रोजी रात्रीपासून पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग तसेच पूर्व विभाग सील करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही मंगळवारी नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत होते. त्यावर पुणे शहर पोलिसांनी नागरिक एकमेकांच्या संपर्कात येवू नये यासाठी पुणे शहरातील खडक, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रस्ते, गल्ल्यांमधील भागात संचार मनाईचा आदेश दिला आहे. यामुळे या भागात फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान बुधवारी सकाळपासून सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी व परिसरात कर्फ्यु लावण्यात आला आहे. सिंहगड रोडवरील नऱ्हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात येत आहेत. पोलीस लोकांना घरातून बाहेर पडू नका, असे स्पिकरवरुन आवाहन करीत आहे. पुण्यात आज आठ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तसेच नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील अनेक भागात लोकांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी काही जण आता कोराना बाधित असल्याचे आढळून आले. तसेच या परिसरात लोक लॉक डाऊन केला असतानाही तो पाळताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातही कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रोडवर येणारे रस्ते, गल्ल्या, बॅरिकेट लावून बंद करण्यात येत आहेत.

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी सांगितले की, एक एक भाग बंद करण्यात येत आहे. लोकांना घरात थांबण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

दहा दिवसांचा किराणा भरुन ठेवा – पोलीस आयुक्त
करोनाचा संसर्ग दिवसें दिवस वाढत आहे, तसेच मृत्यूची संख्याही वाढत आहे. मात्र असे असतानाही नागरिक दररोज भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. शहरातील करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता टप्प्याटप्याने कर्फ्यु इतरही भागात लावला जावू शकतो. यामुळे नागरिकांनी दहा दिवसांचा किराणा एकदाच भरुन ठेवा. खरेदीसाठी सारखे सारखे बाहेर पडल्याने संसर्गाची लागण होऊ शकते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आणणे आवश्‍यक आहे. त्यानुसार मंगळवारपासून कर्फ्यु लावला आहे.

दोन तास दुकाने चालू राहणार
प्रतिबंधित भागात जीवनावश्‍यक वस्तू व सेवा पुरविणारी दुकाने सकाळी ते या कालावधीत केवळ दोन तासासाठी सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी टाळून सोशल डिस्टसिंगचा अवलंब करावा अन्यथा सदर दुकान तत्काळ बंद करण्यात येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like