आईच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेतून खासगी विमान घेऊन येण्याची तयारी, महिनाभर मृतदेह हॉस्पिटलमध्ये

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहीजणांना जवळच्या नातेवाईकांस आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. लॉकडाउनमुळे अमेरिकेत 2 हजारांपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. विमानसेवा बंद असल्याने त्यांना भारतात येता येत नाही. असेच एक भारतीय सुरेशबाबू मुथ्थूपंडी हे मागील 24 वर्षांपासून अमेरिकेत काम आहेत. त्यांच्या आईचे आंध्र प्रदेशात 1 एप्रिलला निधन झाले होते. मी आल्याशीवाय आईवर अंत्यसंस्कार करू नका असे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितलंय. त्यामुळे 1 एप्रिलपासून त्यांच्या आईचे पार्थिव हॉस्पिटलमध्येच आहे. आईचे पार्थिव पाहण्यासाठी आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी खासगी विमान घेउन येण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्रा, परवानगी मिळत नसल्यामुळे ते नाराज झाले आहेत.

सुरेशबाबू यांनी आग्रह केल्याने कुटुंबीयांनी पार्थिव हॉस्पिटलमध्ये शितपेटीत ठेवले आहे. 14 तारखेला लॉकडाऊन संपल्यावर लगेच येता येईल असे त्यांना वाटले होते. परंतू, 03 मे पर्यंत आणि आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न सुरेशबाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.त्यांनी न्यूयॉर्कच्या भारतीय वकिलातीला परवानगीही मागितली होती. मात्रा, विमानसेवा सुरू झाल्याशीवाय ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. आईला शेवटचे पाहण्याची माझी इच्छा आहे. मी खासगी विमान भाड्याने घेऊन जाण्यासही तयार आहे. फक्त परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.