रेल्वेची मोठी घोषणा : 22 मे पासून ‘शताब्दी’ आणि दुसऱ्या ‘एक्सप्रेस’ ट्रेन सुरू होणार, ‘वेटिंग’ तिकिटावर करू शकणार प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसस्था – स्थलांतरीत मजूर आणि कामगारांसाठी श्रमिक विशेष ट्रेन आणि त्यानंतर नगारिकांसाठी 12 मे पासून विशेष राजधानी ट्रेन चालवण्यात येत आहेत. आता रेल्वे मंत्रालय मध्यम वर्गासाठी देशात मेल, एक्सप्रेस विशेष ट्रेन चालवण्याच्या तयारी करत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने बुधवारी (दि.13) अधिकृतपणे सर्क्युलरही जारी केले आहे. या गाड्या वेटिंग तिकीटही असणार आहे. पण तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ हे तिकीट मिळणार नाही. या गड्या 22 मे पासून चालवल्या जातील. या ट्रेनमधील प्रवासासाठी तिकीट बुकिंग 15 मे पासून सुरु होणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून हे बुकिंग केले जाईल.

श्रमिक आणि राजधानी विशेष ट्रेनच्या आधारावर आता मेल आणि एक्सप्रेस या विशेष ट्रेनही चालवल्या जातील. यात शताब्दी आणि इंटर सिटी विशेष ट्रेनचाही समावेश होऊ शकतो. या गाड्यांसाठी तात्काळ तिकीटाची सुविधा नसेल. पण वेटिंग लिस्ट बनवली जाईल. ट्रेनसाठी आरएसी तिकीट मिळणार नाही, असं रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

मेल एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये फर्स्ट एसी किंवा एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी वेटिंगची 20 तिकीटं तर एसी 2 क्लाससाठी 50 तिकीटं आणि एसी 3 क्लाससाठी 100 वेटिंगची लिस्ट असेल. स्लीपर क्लासससाठी वेटिंग लिस्ट ही 200 तिकीटांची असेल. या ट्रेनसाठी तिकीट बुकींग 15 मे पासून सुरु होईल. तर या विशेष ट्रेन 22 मे पासून धावतील. कुठल्या मार्गावर या ट्रेन चालवण्यात येणार आहेत, याची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.