Lockdown tips : केवळ ‘नोकरी’ करणाऱ्यानेच नव्हे तर मुले आणि वृद्धांनीही आखावी ‘दिनचर्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू हा असा पहिला साथीचा आजार आहे ज्यामुळे संपूर्ण जगाच्या गतीला ब्रेक लागला आहे. त्याचा प्रभाव सांगतो की मानवी विचार, समज, गरज आणि सवय संपूर्ण जगात समान आहेत. म्हणूनच आज संपूर्ण जगातील लोकांना अशीच समस्या भेडसावत आहे. मुले, तरूण ते वृद्धापर्यंत याचा संघर्ष करीत आहेत. प्रत्येक वर्ग मानसिकदृष्ट्या खचला आहे.

लेट्स टॉक ऑर्गनायझेशनचे संस्थापक कंचन राय स्पष्ट करतात की मानवाचा समस्यांकडे पाहण्याचा अंदाज आणि त्यासोबत डील करण्याचा अंदाज हा संक्रमणाच्या काळात जीवन जगण्याला कसे सामोरे जावे हे स्पष्ट करतो. येथे असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण वर्तमानातील संकटाला भविष्यातील सामर्थ्यामध्ये रूपांतरित करू शकता. परिस्थितीचा परिणाम प्रथम मुलांवर होतो, म्हणूनच मुलांसाठी काही टिप्स आपण पाहूया…

मुलांसाठी –

घराच्या वातावरणाचा मुलांवर जास्त परिणाम होतो, म्हणून आपला मानसिक ताण त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. आजची मुले त्यांचा अभ्यास, करिअर आणि त्यांचे भविष्य याबद्दल खूपच संवेदनशील आहेत. या सर्वांच्या दरम्यान कोरोनामुळे त्यांच्या शाळा, अभ्यास आणि क्रीडा प्रकारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी त्यांना व्यस्त ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. पुढील काही विशेष पद्धती जाणून घेऊया.

1. लक्षात ठेवा की त्यांचे झोपण्याचे आणि उठण्याचे वेळापत्रक ठीक असावे

2. त्यांना योगासनं आणि व्यायामाची सवय लावा

3. मुले योग्य वेळी आणि योग्य तेवढे खात असल्याची खात्री करा

4. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि त्यांच्याशी संवाद साधा

5. जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, त्यांचे बालपण याबद्दल बोला

6. मुलांची स्तुती करा, त्यांच्यात काय विशेष गुण आहेत ते सांगा

7. ऑनलाइन क्लासेस मध्ये त्यांना मदत करा

येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे मुलांना मानसिक शक्ती दिली पाहिजे. या वैश्विक साथीच्या रोगास जेवढे आपण समजत आहोत तेवढीच जाणीव मुलांनाही करून द्या. याबाबत मुलांना समजावून सांगणे आणि भविष्यासाठी त्यांना शक्तिशाली बनविणे ही पालकांची जबाबदारी आहे. यासह, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण स्वतः सकारात्मक असाल तेव्हाच आपण मुलांमध्ये सकारात्मकता भरण्यास सक्षम असाल.

पालकांनी लक्षात ठेवावे –

लक्षात ठेवा, या वादळात आपल्या घराच्या जहाजाचे कर्णधार आपणच आहात. आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याची जबाबदारीही आपली आहे. तंत्रज्ञान यामध्ये आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याद्वारे आपल्याला काही नवीन माहिती, काही नवीन छंद, काही नवीन गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची संधी आहे. जाणून घ्या काही टिप्स.

1. व्हिडिओ चॅटद्वारे दूरदूरच्या नातेवाईकांना एका स्क्रीनवर आणणे

2. मुलांना इतिहास, तंत्रज्ञान, बदलत्या जगाविषयी गुगलवरून माहिती देणे

3. मुलांना नवीन भाषा शिकण्यास प्रवृत्त करणे

4. मुलांना पत्र लेखन, आभासी खेळ यासारख्या गोष्टी देखील शिकविल्या जाऊ शकतात

वृद्धांसाठी काही टिप्स –

कोरोनाचा सर्वात मोठा कहर फक्त या वृद्ध लोकांवरच होत आहे. जर परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर घरामधील वडीलधारी आणि मुले एकत्रितपणे साथ देत असतील तर कोरोनाचा सामना करणे त्यांना अधिक सोपे जाईल. वृद्धांना त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अनुभव असतो. विचार करा की आयुष्यात प्रत्येक गोष्ट केल्यानंतर, सर्व काही पाहिल्यानंतर आता स्वत:ला वेळ देण्याची वेळ आली आहे. येथे काही टिप्स जाणून घ्या, ज्या की वृद्धांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

1. आपले सामाजिक सर्कल, आपले मित्र यांच्याशी फोन आणि व्हिडिओ कॉलने कनेक्ट व्हा

2. तरुणपणाच्या व्यस्ततेमुळे वाचू शकला नाहीत असे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा

3. अध्यात्माकडे कल वाढवा आणि विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संबंध समजून घ्या

4. टीव्हीवर किंवा नेटवर आपले आवडते कार्यक्रम आणि मालिका पहा

5. दूरदर्शनवरील रामायण, महाभारतासह काही जुन्या मालिका आपल्याला मदत करू शकतात.