Unlock 3 : 31 ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज अन् कोचिंग क्लासेस बंदच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशभरातल्या लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल होणार आहेत. केंद्र सरकारने अनलॉक 3.0 ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये जिम आणि योगा क्लासेस 5 ऑगस्टपासून सुरु करता येणार आहे. तर रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. परंतु शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत.

गृमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महाविद्यालये, शाळा आणि मेट्रो बंदच राहणार आहेत. हे अनलॉक 3 मध्ये सुरु करणे शक्य नाही. याशिवाय सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह देखील बंद राहतील. कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

अनलॉक -3 दरम्यान सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक धार्मिक कार्य करण्याची परवानगी नाही. याव्यतिरिक्त शाळा महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहतील.