Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान झाडावर दिसलं ‘त्रिशुळ’ अन् ‘डमरू’, पाहण्यासाठी झाली गर्दी, पोलिसांना आला ‘घाम’

झारखंड :  वृत्तसंस्था –   झारखंडच्या रामगडमध्ये लॉकडाऊन दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो महिला आणि पुरुष त्यांच्या जीवाची पर्वा न करता आणि या लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करत प्रार्थना करू लागले. ही गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांना घाम गाळावा लागला.

खरं तर, रामगड जिल्ह्यातील कुजू भागात सोमवारी संध्याकाळी शेवग्याच्या झाडाच्या खोडात त्रिशूळ आणि डमरूचे चित्र दिसले. ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. नंतर बघता बघता दूरदूरपासून गावकरी जमा होऊ लागले.

येथील लोकांच्या या आस्थेने लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास आणि मास्क लावणे या सगळ्याचा विसर पडला. पूजेची सामग्री घेऊन गावकरी तेथे पोहोचू लागले. एवढेच नाही तर ग्रामस्थांनी तेथे पूजा करण्यासही सुरवात केली. या सर्वांच्या मधेच एक महिला भक्त नाचू लागली आणि धुमाकूळ घालू लागली. काहीच लोकांनी मास्क लावलेले दिसले.

गावातील महिला सावित्री देवी म्हणाल्या की, झाडाला त्रिशूळ आणि डमरू आहे. शंकरजी आज कुजू भागात आले आहेत. आम्ही येथे रात्री दिवे लावतो.

villege

त्याच वेळी कुजू पोलिस उपनिरीक्षक सामंत दास हे विवश होत म्हणाले कि येथे लोकांची गर्दी आहे. असे दिसते आहे कि शेवग्याच्या ज्या झाडामध्ये त्रिशूळाचा आकार बनला आहे, तिथे महिला एकत्र पूजा करत आहेत. त्यांना हटवण्याच्या प्रयत्न करत आहोत. थोड्या वेळाने पुन्हा ही गर्दी झाली.

अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण झाला आहे की, एकीकडे संपूर्ण देश लॉकडाऊनला यशस्वी करत आहे जेणेकरुन लोकांना लवकरच या साथीच्या आजारापासून मुक्ती मिळेल. यासाठी सरकार सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचा सल्ला देत आहे. तर दुसरीकडे अशा गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

२५ मार्चपासून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले आहे, तरीही गावकऱ्यांचा एवढा मोठा जमाव एकत्रित होताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, भगवान भोलेनाथ स्वतः संकट काळात प्रकट झाले आहेत.