Lockdown in Maharashtra : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन वाढणार?, राजेश टोपेंचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. लॉकडाऊन (Lockdown) काळात रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप दैनंदिन नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढवला जाणार, पण यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार, ज्या जिल्ह्यात प्रमाण कमी झालं आहे तिथं काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले, कोरोना उपचाराचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे असा आमचा प्रयत्न आहे. आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी साखरसंकूलमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

तर त्याचे परिणाम होऊ शकतात

कोरोनावरील उपचारांचे काही नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार रुग्णाच्या कोणत्या स्थितीत कोणती औषधे द्यायची हे निश्चत आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला पहिल्या दिवशी कोणती औषध देयची, दुसऱ्या दिवशी काय उपचार करायचे याचा विचार केला गेला पाहिजे. याच पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांना वारंवार सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण दिले जाते. उपचारांची औषधे, त्याचे प्रमाण वगैंरेमध्ये फरक पडत असेल तर कदाचित त्याचे परिणाम होऊ शकतात, असे मत टोपे यांनी व्यक्त केले.

म्युकरमाक्रोसिससाठी 131 हॉस्पिटल

म्युकरमाक्रोसिसच्या रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. राज्यात असे 131 हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी मोफत उपचार केले जातात, असेही टोपे यांनी सांगितले.

इंजेक्शन उपलब्ध होण्यास अडचणी

म्युकरमाक्रोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाही. या इंजेक्शनचा सर्व कंट्रोल केंद्राकडे आहे. केंद्र महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन देते त्याप्रमाणे त्याचे वाटप केले जाते. इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होतो, असेही टोपे यांनी म्हटले.

नितीन गडकरींचे मानले आभार

पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. वर्ध्यात इंजेक्शनचं उत्पादन सुरु होतेय, ते इंजेक्शन महाराष्ट्राला मिळतील असे टोपे यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेबद्दल सांगताना त्यांनी ग्लोबल टेंडर काढले असून त्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

तर माझ्याकडे तक्रार करा

कोरोनावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलकडून रुग्णाकडून वाढीव बिले आकराली जात आहे. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, प्रत्येक बिल तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉस्पिटल बाबत तक्रार असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Also Read This : 

 

Pune : नियोजित पत्नीसह स्वारगेट चौकात थांबलेल्या तरूणास अश्लील शिवीगाळ, डोक्यात दगड घालून लुटणार्‍या दोघांना अटक

 

कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या

 

राज्य व देशाला पुन्हा उभा करण्यासाठी व्यापार क्षेत्राला ताकद द्या ! पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची मागणी

 

घशात खरखर होण्याची ‘ही’ आहेत तीन कारणे

 

15 लाखाच्या कर्जावर 54 लाखांची पठाणी वसुली, सावकाराला अटक !

 

दररोज ‘या’ सुपर फूड्सचं सेवन करा, जवळ देखील येणार नाही ‘कॅन्सर’