लॉकडाऊनमध्ये Airtel नं लॉंच केला सर्वात स्वस्त प्लॅन ! ‘या’ रिचार्जवर मिळणार 50GB अधिक डेटा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना Work From Home मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अनेक मोबाईल कंपनीने त्यांच्यासाठी नवीन नवीन प्लॅन लॉंच केले आहे. अशामध्ये आता jio आणि वोडाफनला टक्कर देण्यासाठी भारतीय एअरटेल कंपनीने एक खास नवीन प्लॅन लॉंच केला आहे. इतर दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन लॉंच करण्यामागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे सध्या लॉकडाऊनमध्ये सर्व लोक Work from home करतात. अशा तरुणांसाठी हा प्लॅन खूप विशेष आहे.

एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त पॅक लॉंच केला आहे. ग्राहकांना आता 251 मध्ये 50 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. त्यामुळे त्यांना Work from home मध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि ते सहजतेने काम करु शकतील. एअरटेलच्या या खास प्लॅनची बाब म्हणजे त्यामध्ये 50 जीबी डेटा ऑफर उपलब्ध आहे. 50 जीबी अतिरिक्त डेटा 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार असून त्यासाठी कोणतीही वैधता असणार नाही असे कंपनीने सांगितले आहे.

6 जीबी डेटा फ्री मिळणार

98 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीने बदल केला आहे. आधी हा डेटा 6 जीबी मिळत होता त्याऐवजी आता तो 12 जीबी मिळणार आहे. त्याची वैधता 28 दिवसाची असणार आहे. म्हणजेच या 98 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना 12 जीबीचा हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.