खुशबू ,तितिक्षा आणि गौरीच्या लॉकडाऊन स्पेशल स्टोरीज पाहिल्या का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अभिनेत्री गौरी नलावडे, तिच्या दोन्ही मैत्रिणी खुशबू आणि तितिक्षा तावडे यांनी पॉकेटफुल स्टोरीज या युट्युब चॅनलला सुरुवात केली आहे. चॅनलसाठी तिघीही खूप धडपड करताना दिसत आहेत. त्यांनी लॉकडाऊन सीरिजला सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनमुळं गौरी तिच्या गोरेगावच्या घरी रहात आहे. तिच्या या दोन्ही मैत्रिणी खुशबू आणि तितिक्षा तिच्या जवळच राहतात. तिघीही एकत्र येत नवीन गोष्टी शिकत आहेत आणि काम करत आहेत. आपल्या युट्युब चॅनलसाठी त्या अनेक गोष्टी करताना दिसत आहेत.

गौरी आणि तिच्या दोन्ही मैत्रिणींनी मिळून साधारण वर्षभरापूर्वी पॉकेटफुल स्टोरीज या युट्युब चॅनलसाठी सुरुवात केली. त्यांना लॉकडाऊनच्या काळात काही खास करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी या सीरिजची सुरुवात करण्याचं ठरवलं. एरवी फक्त अभिनय करताना दिसणाऱ्या या तिघी आता लेखन, दिग्दर्शन, लाईट्स, कॅमेरा मेकअप अशा सर्व जबाबदाऱ्या पार पडताना दिसत आहेत. गौरीनं लेखन आणि एडिटींगची जबाबदारी स्विकारली आहे. दिवसातील 5 ते 6 तास ती या कामासाठी देत आहे. त्यांनी नुकताच त्यांच्या सीरिजचा पहिला भाग लॉकडाऊन विथ फ्रेंड्स रिलीज केला आहे. याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात अनेक विषय आणि तिघींचे किस्से पहायला मिळत आहेत.