Coronavirus : तब्बल 76 दिवसांनंतर चीननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्लीः वृत्तसंस्था –  कोरोनामुळे सगळीकडे दहशत निर्माण झाली आहे. ज्या देशातून म्हणजेच चीनमधून या प्राणघातक विषाणूचा प्रसार झाला आज त्या देशामध्ये सुधारणा दिसू लागली आहे. या प्राणघातक विषाणूमुळे वुहानमध्ये शेकडोपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. आता वुहानमध्ये पहिल्यासारखे वातावरण झाल्यामुळे तेथील लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. वुहानमध्ये 76 दिवसांपासून लॉकडाऊन सुरु होते. आता लॉकडाऊन हटवण्यामुळे नागरिक मोकळा श्वास घेतील.

वुहान शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता 23 जानेवारी रोजी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वुहान शहरात एकूण लोकसंख्या 1 कोटी 10 लाख एवढी आहे. या शहरात अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. या कोरोना विषाणूमुळे तेथील 3 हजार 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 82 हजार जणांचा या विषाणूची लागण झाली होती. चीन सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने घट झाली आहे. मंगळवारी चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे वुहानमधील लॉकडाऊन हटविण्यात आले आहे. त्याचबरोबर तेथील नागरिकांना परिसरात फिरण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. याआधी लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक कामांसाठीच वुहानमधल्या नागरिकांना घराबाहेर पडता येत होते. याशिवाय शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या होत्या.

लॉकडाऊन संपल्यामुळे शहरातल्या यांग्त्जी नदीच्या किनाऱ्यावर एका संमारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आणि कोरोनाचे रुग्ण यांची ऍनिमेटेड चित्र साकारण्यात आली होती. लॉकडाऊन हटवण्याआधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील रेल्वे स्थानके आणि विमानतळाचा आढावा देखील घेतला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like