Lockdown in Maharashtra : महाराष्ट्रात 1 जूननंतर देखील Lockdown कायम राहणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या काही अंशी घटत असली तरी कोरोनाने मृत्यू होणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्पणे रुग्णसंख्येवर अवलंबून असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाने चाचणी करावी, यासाठीही पुढाकार घेत असून, कोरोना रुग्णसंख्या किती आहे. यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असणार आहे. राज्य सरकारकडून अधिकाधिक लसीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात सर्वांत जलदगतीने लसीकरण होत असून आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लसीकरण झाले आहे. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लसीसकरण करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान देशात गेल्या 24 तासात 2, 63, 533 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4, 22, 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 4, 329 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.