लॉकडाऊन’मध्ये प्रेक्षकांसाठी मोठं गिफ्ट ! पुन्हा टेलीकास्ट होणार ‘रामायण’, कधी आणि कुठे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :24 मार्च 2020 पासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला आहे. अशात मनोरंजन विश्वातून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठी घोषणा करत सांगितलं आहे की, दूरदर्शनवर रामानंद सागर यांचा फेमस शो रामायणचं प्रसारण केलं जाणार आहे.

प्रकाश जावडेकरांनी ट्विट करत प्रेक्षकांना खुशखबरी दिली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, “जनतेच्या मागणीनंतर आता शनिवार दि 28 मार्च 2020 पासून रामायणचं पुन: प्रसारण दूरदर्शनवर केलं जाणार आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड सकाळी 9 वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री 9 वाजता प्रसारीत केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती की, दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा सुरू केल्या जाणार आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशलवरून तशी मागणीही केली होती. या सगळ्यानंतर आता सरकारनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 90 च्या दशकाती किड्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे याबद्द काही शंकाच नाही. चाहत्यांमध्ये या बातमीमुळं आता आनंदची लाट पसरताना दिसत आहे.

https://youtu.be/wtv6-aFbiPY

रामानंद सागर यांच्या रामायणात अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनय असा होता की, रिअल लाईफमध्ये लोक त्यांना देवांचा दर्जा देऊ लागले होते.