‘लॉकाडाऊन’मुळं वडिल सलीम खानपासून दूर ‘भाईजान’ ! सलमान खाननं शेअर केला ‘अनसीन’ फोटो

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलवूड स्टार सलमान खान आपल्या कुटुंबियांच्या किती क्लोज आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याला नेहमीच आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला आवडतं. लॉकडाऊनमुळं सलमानही घरातल्यांपासून दूर आहे.

सध्या सलमान खानही क्वारंटाईनमध्ये आहे. या काळात तो आपले वडिल सलीम खान यांना खूप मिस करत आहे. सध्या सलमान आणि त्याचे वडिल सलीम यांचा एक थ्रोबॅक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अलीकडेच सलमान खाननं व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं की, 3 आठवडे झाले तो सध्या त्याच्या फार्म हाऊसवर आहे. तो वडिलांना खूप मिस करत आहे. सलमाननं सांगितलं की, 3 आठवडे झाले तो वडिलांना भेटला नाहीये.

सध्या सलमान आणि त्याचे वडिल यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशलवर व्हायल होताना दिसत आहे. या फोटोल चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

View this post on Instagram

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like