पाकिस्तानवर आलं ‘संकट’ अन् पंतप्रधानांनी पसरले भारता पुढं ‘हात’, केली ‘विनवणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताच्या व्यापारिक संबंधात तणाव निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर दोने देशातील व्यापारिक संबंध पूर्णता बंद झाले, परंतु पाकवर आर्थिक संकट आल्याने पाकिस्तनला पुन्हा व्यापारिक मदतीसाठी हात पसरवावे लागले आहेत. सध्या पाकिस्तानसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते देशात पसरलेले नाकतोडे. यामुळे पाकची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की इमरान खान सरकारला राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली.

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने घेतला निर्णय –
या नाकतोड्यांपासून सुटका करण्यासाठी पाकिस्तान सरकार यावर विचार करत आहे की ते भारतातून एकदा किटकनाशक आयात करावीत. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉन ने एका अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालानुसार मंगळवारी पाकिस्तानच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत भारतातून किटकनाशक आयात करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.

नाकतोड्यांच्या अटॅकने पाकिस्तान हैराण –
एका दशकापूर्वी पाकिस्तानात नाकतोड्यांचा प्रकोप झाला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच महिन्यात झालेल्या बैठकीत पाक पंतप्रधान इमरान खान यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यासाठी पाकिस्तानने 7.3 अरब रुपयांची तरतूद केली आहे जेणे करुन नाकतोड्यांची निपटारा करता येईल.

10 ऑगस्टपासून व्यापार बंद –
या बैठकीत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) कडून 450 मिलियन डॉलर मिळवण्याचा विचार केला गेला. 10 ऑगस्टपासून भात पाक व्यापार बंद आहे. काही वृत्तानुसार असे सांगण्यात येत आहे की भारतातून किटकनाशके फक्त एकदाच मागवता येतील त्यानंतर अनिश्चित काळापर्यंत कोणताही व्यापार होणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like