…तर मग प्रशासकीय अधिकारी, सत्ताधारी भाजपवरही गुन्हे करा : कलाटे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव्य पाहता विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेच्या महासभेत कुत्रे आणून पालिकेच्या प्रशासनाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. जर आपण साने यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर मग शहरात ‘स्वाईन फ्लू’मुळे अनेकांचे बळी गेले आहेत. यास जबाबदार धरून प्रशासकिय अधिकारी आणि सत्ताधारी भाजप यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आज महासभेत केली.
[amazon_link asins=’B078M16N8P,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14dca1c8-bc27-11e8-9935-f17d08e6d9e2′]

महापालिका प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा वचक राहिला नाही, शहरातील मोकाट कुत्री पकडली जात नाहीत, जी पकडली जातात ती मोशी परिसरात सोडतात परत ती आजू बाजूच्या परिसरात येतात, याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क सभागृहात कुत्रे घेऊन येण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी विनंती केल्यानंतर हा प्रकार थांबला. मात्र साने यांनी कुत्रे आणल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात जोरदार चर्चा सुरु केली. पाळीव प्राण्याचा छळ केल्या प्रकरणी साने यांच्यावर पेटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावर महासभेत बोलताना राहुल कलाटे म्हणाले, पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची नवीन प्रथा सुरु झाली आहे. शहरात कुत्रे, डुक्करांचा सुळसुळाट सुरु असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी कुत्र्यांची पिल्ले आणली होती. तथापि, सत्ताधारी नगरसेवकांनी कुत्र्यांची पिल्ले लहान असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भाषा सुरु केली. कुत्र्यांची पिल्ले आणण्या मागची भावना समजून घेणे अपेक्षित आहे. विरोधकांनी शहरातील जनतेसाठी हा प्रश्न मांडला आहे. पंरतु, सत्ताधारी प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात, हे अत्यंत चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची खूपच हौस आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F,B07CZM1ZQ8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d385f52-bc27-11e8-8b36-1fbfe903a151′]

‘स्वाईन फ्लू’ने पिंपरी चिंचवडमध्ये कहर माजविला असून जानेवारीपासून २० जणांचा बळी घेतला आहे. नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारीच कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कलाटे यांनी केली.

चेष्टेने गुदद्वारात हवा साेडल्याने कामगाराचा मृत्यू