लोह्यातील नागरिकांचा संताप….चक्क नगर परिषदेच्या कार्यालयावर चिखलफेक

लोहा  : पोलीसनामा ऑनलाईन 

नांदेड जिल्ह्यातील लोह्यातील एक विचित्र घटना समोर आली आहे. नागरिकांनी चक्क नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या दालनावर चिखल फेकल्याचे समजले आहे.  काही भागात विकास कामे केली नसल्याने तेथील नागरिकांनी चिखलफेक करून त्यांचा असंतोष व्यक्त केला आहे. आज सकाळीच ही घटना घडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4caa066e-ceba-11e8-93be-0b44fc625c50′]

लोह्यातील नागरिक हे विविध समस्येमुळे त्रस्त झाले होते. शिवाय विकास कामे नसल्याने काही भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार नगरपालिकेकडे मागणी करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर नागरिकांनी संतप्त होऊन कार्यालयावर चिखलफेक केली, कार्यालयाची नासधुस केली. आज दि १३ रोजी सकाळीच काही नागरिकांनी अध्यक्ष कक्षावर ही चिखलफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी चिखलफेक करणाऱ्यांवर लोहा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुठा कालवा तिथे अवैधपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला

शहरातील भोई गल्लीत या भागात अनेक दिवसांपासून पाणी, वीज, स्वछता नसण, रस्ते, नाल्या अादि मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे सदर सुविधा लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जनतेकडून करण्यात आली होती. सदर मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागिरांनी नगरपालिका कार्यालयावर चिखलफेक करुण आपला रोष व्यक्त केला. चिखलफेक करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने लोहा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. दरम्यान काही नागरिकांनी अध्यक्ष कक्षावर ही चिखलफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचेही समजत आहे.

[amazon_link asins=’8192910962,817992162X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’392062f7-cebb-11e8-ad11-c5f1fc9d0996′]