Lok Adalat | राष्ट्रीय लोक आदालतमध्ये वाहतूक शाखेच्या 10 हजार केसेस निकाली, 1.22 कोटींचा दंड जमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी आज (रविवार) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात राष्ट्रीय लोक आदालतीचे (National Lok Adalat) आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये (Lok Adalat) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन कोर्टामध्ये पुणे वाहतूक विभागाचे (Pune Traffic Branch) तब्बल 10 हजार खटले निकाली काढण्यात आले. तसेच एक कोटी 22 लाखांचा दंड वसुल करण्यात आला.

आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 9991 खटल्यांचा निकाल लावण्यात आला. तर 1 कोटी 22 लाख 58 हजार 750 रुपये दांडाची रक्कम जमा झाली. सदरचे कामकाज पुणे दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Commissioner of Police Amitabh Gupta) व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Deputy Commissioner of Police Rahul Shriram) यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचने प्रमाणे पार पडले.
राष्ट्रीय लोक आदालतीचे कामकाज मोटार वाहन न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एस. एस. पारखे (S. S. Parkhe) व वरिष्ठ लिपिक आर. डी. भुरकुंडे (R. D. Bhurkunde) यांनी पाहिले.

राष्ट्रीय लोक आदालतमध्ये पुणे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आई. यू. पटेल, डी. सी. आंब्रे,
पोलीस शिपाई के. आर. शिंदे, व्ही. के. खोत, महिला पोलीस हवालदार व्ही. ए. चिंचोळकर,
महिला पोलीस नाईक आर.एच. इनामदार, महिला पोलीस शिपाई पी. व्ही. साळवे,
एम. आर. राठोड, एस. एस. धोत्रे, एस. एस. विभुते, एस. ए. भोसले, वाय एम मोहिते यांनी
राष्ट्रीय लोक आदालतीचे काम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Web Tital : Lok Adalat | 10,000 cases of transport branch settled in National People’s Court, fine of Rs 1.22 crore collected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ! ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ

Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)