चौकीदार फक्त श्रीमंतांचे असतात : प्रियंका गांधी

प्रयागराज : वृत्तसंस्था – चौकीदार हे फक्त श्रीमंतांचे असतात…! अशी टीका उत्तर प्रदेश पूर्वच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे . प्रियंका गांधी या सध्या प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात प्रचार दौऱ्यावर आहेत.

‘चौकीदार चोर हैं’ या शब्दांच्या आधारे काँग्रेस गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर निशाणा साधत आहे . मोदींवर टीका करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की , ‘ चौकीदार हे फक्त श्रीमंतांचे असतात . मोदी हे गरिबांचे नाव घेत असले , तरी ते फक्त श्रीमंतांना संरक्षण देतात.’

परंपराए , रिती -रिवाज कभी नाही बदलते –

प्रियंका गांधी यांनी आज प्रयागराज येथून ‘गंगा यात्रा’ सुरू केली . सकाळी त्‍यांनी प्रयागराज येथील हनुमान मंदिराला भेट दिली.  त्यांचा हाच फोटो उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाने ट्विट केला आहे . फोटोमध्ये प्रियंका हनुमानाच्या मुर्तीला फुले वाहत आहेत . या फोटो सोबत काँग्रेसने इंदिरा गांधी यांचा देखील फोटो ट्विट केला आहे . यामध्ये देखील इंदिरा गांधी हनुमानाच्या मुर्तीला फुले वाहत आहेत.  हे दोन फोटो शेअर करते वेळेस उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाने परंपरा आणि रितीरिवाज कधीच बदलणार नाहीत . अशी कॅप्शन दिली आहे.

https://twitter.com/INCUttarPradesh/status/1107545485475090432

काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियंका गांधी १७ ते २० मार्च दरम्‍यान तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौर्‍यावर आहेत . जलमार्गाने काढलेल्‍या या यात्रेवेळी प्रियंका गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत . १४० किलोमीटरच्या या यात्रेत प्रियंका विद्यार्थ्यांशी ‘सच्ची बात ‘ करत संवाद साधणार आहे .  मोदींच्या ‘मन की बात’ च्या धर्तीवर ‘सांची बात’ हा उपक्रम आखण्यात आलाय .  प्रियंका यांच्या या जलयात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठिकठिकाणी “माँ गंगा ने बुलाया है” असे पोस्टर्स लावले आहेत.