शीख दंगली मुद्द्यावर गदारोळ ; संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – शीख विरोधी दंगलीच्या निकालाचे  आणि राफेल कराराच्या निकालाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमठले आहेत. संसदेची कार्यवाही सकाळी ११ वाजता सुरु होताच विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस सदस्यांनी गदारोळ माजवण्यास सुरुवात केली. गदारोळ वाढत गेल्यामुळे लोकसभा प्रथम १२ वाजे पर्यंत तहकूब करण्यात आली. दुपारी बारा वाजता लोकसभेचे कामकाज सुरु होताच पुन्हा गदारोळ सुरु झाला म्हणून लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरु होणार आहे.

राज्यसभेत  अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनी तामिळनाडूच्या स्थानिक मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.  त्यांनी गदारोळ माजवून सदन बंद पडण्याची रणनीती पहिल्या पासूनच ठरवली असल्या प्रमाणे  ते आक्रमक वाटत होते. राज्यसभेत कामकाज करण्यास या गदारोळाचा अडथळा होऊ लागल्या मुळे राज्यसभा अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोन वाजे पर्यत कामकाज तहकूब केले आहे. तामिळनाडूच्या  स्थानिक प्रश्नांवर केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. तामिळनाडूत भाजपला जनमत नसल्याने त्या राज्याकडे भाजपचे लक्ष नाही असा आरोप   अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या खासदारांनी संसदेत केला आहे.

तर तिकडे लोकसभेत  कालच्या दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर काँग्रेस खासदारांनी गदारोळ माजवला आहे. लोकसभेत राफेल करारावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर चर्चा घेण्यासाठी सरकार तयार आहे परंतु काँग्रेस गदारोळ करून राजकीय स्वार्थ साधवून घेते आहे. असा आरोप अमित शहा यांनी राफेल निकाल आलेल्या दिवशीच पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या आरोपाचाच प्रत्येय आज लोकसभेत आला आहे. काँग्रेसाने संसदेचे कामकाज सुरु होताच काँग्रेस खासदारांनी गदारोळ सुरु केला. गदारोळात कामकाज सुरु ठेवण्यात आवाजाचा अडथळा होत असल्याने लोकसभेचे कामकाज प्रथम १२ वाजे पर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर बारा वाजता लोकसभेचे कामकाज सुरु झाले. कामकाज सुरु होतातच काँग्रेस खासदारांनी पुन्हा गदारोळ माजवण्यास सुरुवात केली. गदारोळ वाढल्यामुळे लोकसभेच्या सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.