Lok Sabha And Assembly Election 2024 | लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रीत होणार?, प्रशासन सज्ज

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha And Assembly Election 2024 | राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मध्यावधी निवडणुका (Maharashtra Assembly Election) होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. काहींनी देशात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका (Assembly Elections) एकत्रीत होऊ शकतात अशी चर्चा असतानाच आता यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (State Chief Electoral Officer) श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले दोन्ही निवडणुका (Lok Sabha And Assembly Election 2024) एकत्रीत घेण्यास प्रशासन सज्ज आहे.

श्रीकांत देशपांडे (Maharashtra State Chief Electoral Officer Shrikant Deshpande) हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भंडाऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करत आहेत. देशपांडे यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरवात विदर्भातून केली आहे. आढावा घेण्यासाठी ते भंडारा येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Lok Sabha And Assembly Election 2024)

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना देशपांडे म्हणाले, कोणतीही निवडणूकची तयारी महिनाभरात पुर्ण होत नाही.
तर त्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी
व निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना देशपांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा
या दोन्ही निवडणुक होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग
(Election Commission) आणि प्रशासन सज्ज आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
त्यामुळे आता देशातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

Web Title :- Lok Sabha And Assembly Election 2024 | administration ready to hold lok sabha assembly elections together information from chief electoral officer shrikant deshpande

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे तर ‘मख्खमंत्री’ बसलाय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ST Bus News | एसटीच्या भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत, आजपासून नवे नियम लागू

Ajit Pawar | दुधात भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अजित पवारांची विधानसभेत मागणी (व्हिडिओ)