Homeक्राईम स्टोरीअबब ! पोलिसांनी पकडले तब्बल ४०५ अवैध हत्यारं, ७३९ काडतुसं, २ कोटींची...

अबब ! पोलिसांनी पकडले तब्बल ४०५ अवैध हत्यारं, ७३९ काडतुसं, २ कोटींची दारू व १.५ रुपयांची रोकड

बुलंदशहर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान ४०५ अवैध हत्यारं, ७३९ काडतुसं, २ कोटी रुपयांची दारू, १ कोटी ५० लाख रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूकीवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा हिंसाचार घडवून आणण्यासाठी ही हत्यारे आणली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. आता सहा टप्प्यातील मतदान अजून होणे बाकी आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदान २ दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री बुलंदशहर पोलिसांकडून तपासणी केली जात होती. त्यावेळी पोलिसांना हा शस्त्रसाठा, दारू आणि रोकड मिळून आली.

बुलंदशहरचे एसएसपी एन. कोलांची यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०५ अवैध हत्यारं, ७३९ काडतुसं, २ कोटी रुपये किंमतीची दारू, आणि १ कोटी ५० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिल रोजी १३ राज्यांमध्ये ९७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यात उत्तरप्रदेशातील ८, छत्तीसगड आणि प. बंगालमधील प्रत्येकी ३, ओडीसा, आसाम, बिहार राज्यांतील प्रत्येकी ५, आणि महाराष्ट्रातील १० तर कर्नाटकातील १४ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News