पाच वर्षात राम मंदिर बांधू शकले नाहीत, विद्यासागर यांचा पुतळा काय उभारणार ? : ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप आणि ममता यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नरेंद्र मोदी पाच वर्षात राम मंदिर बांधू शकले नाहीत, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा काय उभारणार ? असा टोमणा ममता यांनी मोदींना लगावला आहे.

ममता म्हणाल्या कि, पुतळा बांधण्यासाठी बंगालची जनता तुमच्यापुढे भीक नाही मागणार. ममता, अमित शहा यांच्याकडे निर्देश करून म्हणाल्या कि, मंगळवारी तुमचा गुंड नेता इथे आला होता. त्यांनी बंगाल कंगाल आहे असे म्हंटले होते. या मुद्यावर ममता यांनी सातत्याने रॅलीमध्ये विचारले कि बंगालची जनता कंगाल आहे का ? या प्रश्नाला जमलेले लोक ओरडून नाही असे उत्तर देत होते. ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा देखील ममता यांच्या रॅलीत सातत्याने देण्यात आली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील सभेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तृणमूल काँग्रेसच्या गुंडानी पाडल्याचा आरोप केला होता. तसेच विद्यासागर यांचा पंचधातूतील पुतळा आम्ही उभा करू असे देखील मोदी म्हणाले होते.

Loading...
You might also like